सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

रे सख्या.....



सांजवेळी या ठिकाणी आठवांचे नभ कोसळती,
परतीचीही वाट हरवता उगा पाऊले भरकटती,
या अशा अस्वस्थ समयी वळूनी तू बघशील का?
रे सख्या माझिया मनाला साद तू देशील का?

७ टिप्पण्या:

  1. वळूनी पहिले मागे झालीस तू दृष्टीआड,
    चांदणे लुप्त झाले काळ्या ढगांआड,
    पाऊलखुणा सोडिल्या मी वेध त्याचा घेशील का??
    साद दिली सखे मी त्यास समजून घेशील का???

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम.....
    वर्णन केलेस तुझ्या सख्याच्या विरहाचे....

    उत्तर द्याहटवा